Astrology – ज्योतिष

The foundation of every Indian philosophical system is always based on the principle of ‘all-round welfare of mankind’. Be it a physical science like Ayurveda or a system of mental strength like Yoga. In both, the aim is not just treatment or remedy, but the principle of providing a healthy, natural and long-lasting life to the seeker is fundamentally inherent.
The science that achieves ‘all-round welfare’ by properly and timely combining these two, that is, the inner essence of the mind and body, the hidden nature of accumulated karma and the acquired inherent abilities, is Astrology.
The embodiment or experimental form of the concept of ‘spirituality’ (Adhyātma) in the Bhagavad Gita of knowing the ‘self’ (Ātman) is Astrology. The scholars say that the aim of Astrology is to unfold the present and past state of the body, mind and soul of a person and, based on that, to direct his current Karma yoga, that is, to make the person truly aware of his ‘self’ and thereby make his life more and more perfect. Therefore, if you study it a little deeper, you will also realize that although Ayurveda, Yoga, and Astrology are seemingly different sciences, the underlying principles behind them and ultimately their practices are unified.
कोणत्याही भारतीय तत्वप्रणालीचा पाया हा नेहमीच ‘मनुष्यमात्राचे सर्वार्थाने कल्याण’ या तत्वावर उभा असतो. मग ते आयुर्वेदासारखे शारीर शास्त्र असो किंवा योगासारखी मनःसामर्थ्याची प्रणाली. दोन्हीमध्ये केवळ उपचार किंवा उपाय हा उद्देश नसून साधकाला निरोगी, निसर्गपूरक आणि दीर्घकालीन असे आयुष्य प्रदान करण्याचे तत्व मूलतः अंतर्भूत आहे.
याच दोन्हीच्या म्हणजे मन आणि शरीराच्या अंतरीचे सार, संचित कर्माचे गूह्य आणि प्राप्त अंगभूत क्षमतांचा यथायोग्य आणि समयोचित मेळ घडवून ते ‘सर्वार्थाने कल्याण’ साधणारे शास्त्र म्हणजे ज्योतिष.
प्रकर्षाने ‘स्वत्व’ जाणणाच्या भगवद्गीतेतील ‘अध्यात्म’ या संकल्पनेचे मूर्त किंवा प्रायोगिक स्वरुप म्हणजेच ज्योतिष. जातकाच्या शरीर, आत्मन् आणि मनाच्या सांप्रत आणि पुर्वसंचिताचा खोलवर अभ्यास करुन त्या आधारे त्याच्या चालु कर्मयोगाचे दिग्दर्शन करणे, म्हणजेच, जातकाला त्याच्या ‘स्व’ ची यथार्थ जाणीव करुन देणे आणि त्यायोगे त्याचे आयुष्य अधिकाधिक परिपूर्ण करणे हे ज्योतिषाचे उद्दीष्ट्य आहे असे शास्त्रकार सांगतात. म्हणूनच काहीसा खोलवर अभ्यास केल्यास असाही प्रत्यय यावा की आयुर्वेद, योग आणि ज्योतिष ही वरवर पाहता वेगवेगळी शास्त्रे असली तरी मूलतः त्यामागील तत्व आणि अंतिमतः त्यांचे आचरण हे एकसंध आहे.
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact