Ancient Agora Athens – वादविवाद, चर्चा, परिषदा, नाटके, जत्रा तसेच दुकाने, शासनयंत्रणेचा आणि विद्वानांचा राबता यामुळे अगोराचे संकुल हे सतत गजबजलेले सांस्कृतिक केंद्रच होते.
Tag: altar
अथेन्स – भाग ३ – संस्कृतीचे स्तंभ
भव्य नाट्यगृहे, उत्कृष्ट वाचनालये, सुसज्ज क्रीडांगणे, विद्यापीठांची मालिका, उत्तुंग देवस्थाने आणि त्यांच्याही आश्रयाने होणारा नाट्य, नृत्य आणि खेळांचा आविष्कार… ग्रीकांच्या अष्टपैलुत्वाची झलक या वेगवेगळ्या संकुलांमधून येते. एकट्या अथेन्समध्ये अशा अनेक वास्तूंची रचना हजारो वर्षांच्या काळात होत राहिली यावरून विविध अंगानी आयुष्याचा आनंद घेण्याची ग्रीकांची चतुरस्त्र वृत्ती प्रकट होत राहते.