सिएम रिप (#Siem #Reap) हे कंबोडियातलं गाव जिथं अंकोर आणि इतर मंदिरे आहेत. याच गावात १० व्या शतकातलं बांते स्राई (#Banteay #Srei) हे स्वतः राजाने न बांधलेले एकमेव मोठे मंदिर आहे. राजेन्द्रवर्मन २ रा याच्या दरबारातील विष्णुकुमार आणि यज्ञवराह या दोन मानक-यांनी हे शिवमंदिर बांधले. उत्कृष्ट शिल्प आणि कोरीव कामासाठी हे मंदिर विख्यात आहे. यातील काही नमुने