Sheetal Uwach – शीतल उवाच

शीतल उवाच – तत्वज्ञान, आयुष्य आणि आनंद या तीन विषयांवर लिहीणारा ब्लॉग….. भारतीय संस्कृती, संस्कृत भाषा आणि वाङ्मयाची ओळख आणि शिक्षण घेण्यासाठी…….. #sheetaluwach

Sheetal Uwach Blog dedicated to Philosophy, Life and Happiness…. Rationally promoting and teaching Indian Culture, Sanskrit Language and Scriptures…..#sheetaluwach

About Me अस्मादिक
Born somewhere, registered elsewhere, settled somewhere else, 20 years’ career, worked in 4 countries, travelled across 10 or more countries, communicates in 4 languages, a teacher, businessman, translator, amateur travel guide, bookworm, audiophile, loquacious, foody………… I am One many……….
Sheetal Ranade
एका देशात जन्म, दुस-या देशाचा नागरीक, तिस-याच देशात स्थायिक, २० वर्षांचे करीअर, ४ देशात नोकरी, १० हून अधिक देशात मुसाफीरी, ४ भाषांची ओळख. शिक्षक, व्यवसायिक, भाषांतरकार, हौशी गाईड, वाचक, श्रोता, वाचाळ, खादाड…………….. मी एक अनेक………………..
शीतल रानडे

41 thoughts on “Sheetal Uwach – शीतल उवाच”

  1. Inpressive Sir. Your thoughts and vision is well presented and can change anyone life from negativity to positivity. 🙏

  2. भारतीय संस्कृति चा प्रचार करताय ईश्वर तुम्हाला यश देवो . आपले चार सम्प्रदाय आहेत त्या पैकी तुम्ही कुठला संप्रदाय निवडला काय अणि त्याच्या शी जोडले आहे का?

  3. नमस्कार शीतलजी,
    आपल्या ब्लॉगवरील महाभारतावरील सर्व लेख वाचून काढले. फारच सोप्या सुलभ भाषेत आपण विवेचन केले आहे. मनःपूर्वक धन्यवाद.
    उपनिषदांवरील लेख वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपला धर्मग्रंथांचा अभ्यास प्रचंड आहे. त्यामुळेच आपल्याला माझी एक शंका विचारण्याचे धाडस मी करीत आहे. माझ्या वाचनात खाली दिलेला एक श्लोक आला आहे.

    बभ्रूवार्तहिता सदयो भक्त्यांम् अभिष्ठता
    एवं देव्या वर लब्धवा स्पथः क्षत्रियर्षभः

    हे जे मी लिहिले आहे ते बरोबर आहे कि नाही याविषयी मलाच शंका आहे. त्यात जर काही चूक असेल तर योग्य श्लोक काय आहे, हा कोणत्या ग्रंथात आला आहे आणि त्याचा (योग्य) अर्थ काय याविषयी आपण काही प्रकाश टाकू शकाल का?

    धन्यवाद,
    आपला,
    मिलिंद बोडस.
    +918087373530

    1. नमस्कार मिलिंदजी,
      इति दत्त्वा तयोर्देवी यथाभिलषितं वरम् । बभूवान्तर्हिता सद्यो भक्त्या ताभ्यामभिष्टुता।
      एवं देव्या वरं लब्ध्वा सुरथः क्षत्रियर्षभः । सूर्याज्जन्म समासाद्य सावर्णिर्भविता मनुः।

      मार्कण्डेयपुराणातील दुर्गासप्तशतीमधल्या तेराव्या अध्यायात मार्कण्डेयाच्या मुखी हे श्लोक येतात. त्यातला २७ व्या श्लोकाचा अंतिम आणि २८ व्या श्लोकाचा प्रथम चरण तुम्ही मांडला असावा असं दिसतंय
      अर्थ
      अशाप्रकारे, त्यांना इच्छित वर देऊन, त्या दोघांद्वारे स्तुती केली जाणारी देवी तत्क्षणी अंतर्धान पावली.
      अशाप्रकारे देवीकडून वरदान प्राप्त (झालेला) क्षत्रियश्रेष्ठ सुरथ सूर्यापासून जन्म घेऊन सवर्ण मनु होईल.

      दुर्गासप्तशती, त्याची कथा आणि महात्म्य हे तुम्हाला वाचनाला ऑनलाईन सहज उपलब्ध होईल. अधिक माहितीची आवश्यकता भासल्यास जरुर कळवा.

      1. धन्यवाद शीतलजी,
        माझ्या शंका असल्यास मी आपणास निःसंशय विचारू शकतो अशी माझी खात्री आहे.
        पुन्हा एकदा धन्यवाद,
        आपला,
        मिलिंद बोडस

      2. खुपच छान लेख शितलजी अगदी सोप्या भाषेत लिहीता म्हणुन पटकन समजत

Leave a Reply

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact