कंबोडिया… म्हटलं की सगळ्यांसमोर येते ते अंकोरवाटचे भव्य मंदीर. हिंदू राजांनी बांधलेल्या अप्रतिम अद्वितीय शिल्पांपैकी एक. पण अंकोरवाट सारखीच सुंदर पण आकाराने लहान अशी किमान १० मंदिरं त्याच गावात आजुबाजुला आहेत. या मंदिरांतील कुसर ही अंकोर इतकीच तर काही ठिकाणी त्याहीपेक्षा उजवी आहे. हिंदु पुराणातले अनेक प्रसंग त्यात कोरलेले आहेत. त्यातलेच एक बांते स्राई (Banteay Srei). सिएम रिप (Siem Reap) हे कंबोडियातलं गाव जिथं अंकोर आणि इतर मंदिरे आहेत. याच गावात १० व्या शतकातलं बांते स्राई (Banteay Srei) हे स्वतः राजाने न बांधलेले एकमेव मोठे मंदिर आहे. राजेन्द्रवर्मन २ रा याच्या दरबारातील विष्णुकुमार आणि यज्ञवराह या दोन मानक-यांनी हे शिवमंदिर बांधले. उत्कृष्ट शिल्प आणि कोरीव कामासाठी हे मंदिर विख्यात आहे. यातील काही नमुने १. खांडवप्रस्थ दहनाचा देखावा २. उन्नत महादेव शिव ३. वाली आणि सुग्रीवाचे युद्ध लाल पाषाणांमध्ये कोरलेल्या अशा अनेक शिल्पांचे बांते स्राई (Banteay Srei) किंवा त्रिभुवनेश्वराचे मंदिर…..
Cambodia … the word reminds everyone of magnificent temple of Angkor Wat. One of the unique sculptures built by Hindu Kings outside India. For a pleasant surprise there are at least 10 temples around the same village that are equally beautiful but relatively smaller in size. Craftsmanship in these temples is as splendid as Ankor, sometimes even better! Incidents from Hindu Scriptures (Purana) are engraved everywhere. One such timeless beauty is Banteay Srei. Siem Reap is literally a living exposition of world class temples. Amongst all 10th century Banteay Srei is the only large temple not built by the a Royal himself. This Shiva temple was built by Vishnukumara and Yagyavarah from the court of Rajendra Varman II. The temple is famous for its fine sculptures and carvings. Below are few samples 1. Khandavaprastha (Arjuna and Lord Krishna clearing a Jungle for erecting capital city) 2. Mighty Lord Shiva standing upright 3. The battle of Vali and Sugriva (Two Monkey siblings from the kingdom of Great Kishkindha)
Banteay Srei or Tribhuvaneshwara (Lord of all three realms) temple with many such sculptures carved in red stone …..
2 thoughts on “Banteay Srei – #Cambodia”