‘तात्या टोपेज् ऑपरेशन रेड लोटस’ हे पुस्तक याच धर्तीवर अनेक ऐतिहासिक संदर्भांचा खोलवर जाऊन अभ्यास करते. पूर्वजांच्या देदिप्यमान कारकिर्दीचा पट उलगडणे आणि विपरित चित्रण केल्या जाणा-या इतिहासाची ऐतिहासिक संदर्भांसह पुनर्मांडणी करणे हे दोनही उद्देश या पुस्तकातून लेखक साध्य करतो.